Monday, October 28, 2013

आमची जंगलरूम.

आमची  जंगलरूम.
आमच्या घरात आम्ही खोल्यांना नावे दिली आहेत. ओशन रूम, जंगलरूम, स्काय रूम इत्यादी. बाकीच्या खोल्यांमध्ये नावाप्रमाणे काही सजावट नाही मात्र जंगलरूममध्ये जंगलाचे चित्र काढायचे असे बरेच आधी ठरवून ठेवले होते. या चित्रातल्या प्रत्येक प्राण्याला काहीतरी नाव आहे आणि त्या प्राण्यांच्या कथाही आहेत. कथा पुन्हा केव्हातरी इथे देईन. तोवर आमची जंगलरूम बघा.
इथे अजून टेबल, बेड इत्यादी काही केले नाही.  सध्या पसारा मांडून खेळायला जागा हवीये. जरा मोठी झाली की बाकीचे करून घेणार. ते साधेच , मोठे झाल्यावरही वापरता येईल असे असणार आहे  

१ - दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे पियानो , पुस्तकाचे कपाट
 


२ -  पूर्ण भिंतीवरचे चित्र. या भिंतीला लागून असलेल्या भिंतीवर खिडकी आहे.




३.  खिडकीच्या बाजूला मोठे भिंतीतले कपाट.  


४. दरवाज्याच्या डावीकडे व्हाईट बोर्ड आणि त्याखालचे चित्र. व्हाईट बोर्डच्या वर सरस्वतीचे चित्र येणार आहे.