निहारिका घराच्या समोरच्या पायऱ्यावर बसून दोन्ही हाताच्या तळव्यात आपली हनुवटी टेकवून आकाशातले तारे बघत होती. आई घरातले काम संपवून आलीच इतक्यात तिच्या बाजूला बसायला. आई आणि चिमुकली निहा नेहेमीच अस रात्री चांदण्यात बाबांची वाट बघत बसत. आईच्या मांडीवर डोकं ठेवून कितीतरी गोष्टी ऐकायला आणि चंद्र चांदण्या बघायला निहाला फार आवडायचे. निहाच्या आईला तर असंख्य गोष्टी सांगायची हौसच होती. या गोष्टीमध्ये आठवड्यातून एकतरी चंद्राची गोष्ट असायचीच. आजपण चंद्राची गोष्ट सांगून झाल्यावर निहा म्हणाली आई मी मोठी झाले ना कि परी होणार आणि चंद्रावर जाणार. हे निहाच २ वर्षाची होती तेव्हापासूनचे स्वप्न होतं. आईलापण मजा वाटायची ते ऐकून. पण आता ४ वर्षाच्या निहाला जरा खऱ्या गोष्टी पण सांगायला हव्या अस वाटून गेलं आईला. तिच्याकडे बघत आई म्हणाली निहा अग पऱ्या किनई फक्त गोष्टीमध्ये असतात. खऱ्या खऱ्या नसतातातच. निहा जरा विचारात पडली. आता ती काहीतरी नवीन प्रश्न विचारणार हे आईला कळलंच. निहाला खूप वाईट वाटेल कि काय असा आई विचार करतेय तोच प्रश्न आला "मग चंद्रावर कसं जायचं? पऱ्या नाही मग पंखही नाही, कसं उडणार मी?" म्हणजे पऱ्या खऱ्या नाही हे ऐकून हिला वाईट वाटलच नाही तर! आईने मग तिला अवकाशयानातून (स्पेसशिप) चंद्रावर जाता येत. त्यासाठी अंतराळवीर (अॅस्ट्रॉनॉट) व्हावं लागतं अस सांगत दुसऱ्या दिवशीच्या गोष्टीच प्रॉमिस करून तिला झोपायला आत नेलं. झोपेत स्वप्नामध्ये अॅत्रोनात येईल ना आई? अस विचारत निहा गादिवर झोपली खरी पण तिच्या डोक्यात असंख्य प्रश्न होते. आत्ता आईला विचारले तर झोपत नाही म्हणून आई रागावणार हेहि माहिती होतं मग तसेच डोळे बंद करून ती विचार करत करत केव्हा झोपली ते तिलाच कळल नाही.
सकाळी आईने हाक मारून उठवतानाच निहाचा पहिला प्रश्न होता "आई अॅत्रोनात ची गोष्ट?" त्या अॅत्रोनात च्या गोष्टीसाठी सकाळचे आंघोळ खाणे अगदी न कुरकुरता पार पडले. आणि स्वारी गोष्ट ऐकायच्या तयारीत आईजवळ जाऊन बसली.
माहितेय का निहा अगं चंद्र आपल्या पासून खूप दूर असतो. चंद्रावर पण आपल्यासारखीच जमीन असते. सगळी कडे गोल गोल खड्डे असतात. आई सांगायला लागली.
आपल्या रस्त्यांसारखे खड्डे? निहाचे पण प्रश्न सुरु झालेच.
हो तसेच ग.याला विवरं म्हणतात. तिथे चंद्रावर एकाबाजूला ना खूप गरम होत असतं. आणि दुसऱ्या बाजूला खूप खूप थंड असतं.
फ्रीजसारख?
फ्रीजपेक्षापण खूप थंड. चंद्रावर मुळीच हवा पण नसते. पोहोताना नाकात पाणी गेलं कि कसं गुदमरायला होत कि नाही? ते श्वास घेता येत नाही म्हणूनच. चंद्रावर हवा नसते म्हणून श्वास पण घेता येत नाही.
मग आपण कसं रहाणार? निहाची अजून एक रास्त शंका.
होना म्हणूनच अस कोणालाही चंद्रावर जाता येत नाही.
अॅत्रोनात जातो. हो किनई?
हो चंद्रावर जाण्यासाठी अॅस्ट्रॉनॉट व्हावं लागतं. अॅस्ट्रॉनॉट ऑक्सिजन घेऊन जातात बरोबर म्हणून ते गुदमरत नाहीत. एवढ सांगून आईने कॉम्प्युटर चालू केला आणि इंटरनेटवर अॅस्ट्रॉनॉट बद्दल माहिती शोधली. तिथे चित्रे होती विचित्र कपडे घातलेल्या माणसाची. हा अंतराळवीर. इंग्लिशमध्ये म्हणायचं अॅस्ट्रॉनॉट. आणि हे त्याच अवकाशयान म्हणजे इंग्लिशमध्ये स्पेसशिप.
स्पेसशिपला खूप जोरात जातं.अॅस्ट्रॉनॉट स्पेसशिप मध्ये बसून चंद्रावर किंवा आकाशात जातात.
मग तिथे जाऊन काय खेळतात?
खेळायला जात नाहीत काही. तिथे वेगवेगळे प्रयोग करायला जातात. आकाशात अजून काय काय आहे, चंद्रावरची माती कशी आहे अशा बऱ्याच गोष्टी बघायच्या असतात त्यांना.
मी बागेत माती बघते तशी?
उं... थोडफार तसच बर. बर हा चंद्र आपल्या पृथ्वीभोवती गोल गोल फिरतो. म्हणून कधी कधी बारीक दिसतो आणि कधी कधी गोल दिसतो.
आता निहा इंटरनेटवरची चित्र आणि व्हिडीओ बघण्यात गुंग झाली होती. तसली छान छान चित्र पाहून आणि अॅस्ट्रॉनॉटचे कपडे बघून तिच्या मनाने ठरवून टाकले कि आता आपण अॅस्ट्रॉनॉटच व्हायचे , नाहीतर चंद्रावर जाता येणार नाही आपल्याला.
रात्री बाबा आल्यावर दरवाज्यातच त्याना गाठून मी परी होणारच नाहीये. मी ना अॅत्रोनात होणार आहे अशी घोषणा सुद्धा करून झाली.
आता या गोष्टीला २० वर्ष झालीत. तेव्हाची चिमुकली निहा आता खूप उंच झालीये. आणि खूपखूप अभ्यास करून इस्रो (ISRO)मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतेय. आता भारताचे स्पेसशिप चंद्रावर जाणार आहे ना त्यात निहारिका सुद्धा असणार आहे. त्याची तयारी केव्हापासूनच सुरु झालीये इस्रोमध्ये.
निहाची आई आणि बाबा पण आपल्या चिमुकलीचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून आनंदात आहेत.
निहारिकाने तिचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले खूप अभ्यास केला, अजूनही करतेच आहे.
तुमची सुद्धा स्वतःची मनापासून इच्छा काही करायची असली आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न केलेत ना कि सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतात बर.

4 comments:
स्वप्नाली,
छान लिहिली आहे ही गोष्ट. खरी आहे का?
मला माझ्या मुलाला सांगायला अशाच गोष्टी हव्या असतात.
आज सांगेन त्याला झोपताना!
धन्यवाद....
योगेश
योगेश धन्यवाद :)
हि काल्पनिक कथा अाहे.
तुमच्या मुलाला अावडली तर मला नक्की सांगा.
स्वप्नाली,
सांगितली त्याला मी. पण जरा त्याच्या डोक्यावरून गेली. :-) (३ वर्षांचा आहे तो).
पण त्यात एक गम्मत फार आवडली की चंद्रावर उडी मारली की खाली येता येत नाही सहजा सहजी!!
अजुन लिहा तुम्ही. छान सोपी भाषा आहे तुमची.
...... योगेश
योगेश,
:) धन्यवाद.
गोष्टीतुन त्याची शब्दसंपत्ती वाढेल.
Post a Comment