दूरदूर पसरलेली हिरवीगार कुरणे. बाजूने खळाळणारी नदी आणि नदीकाठची दाट झाडी. झाडांच्या शेंड्याशी खेळणारी डोंगराआडून डोकावणाऱ्या सूर्यदेवाची हळदुली किरणं. अशी सुंदर सकाळ होती इथली. अशा या हिरव्या कुरणावर सगळीकडे पांढरे शुभ्र गुबगुबीत ससे टणाटण उड्या मारीत होते. मऊमऊ लुसलुशीत गवत चटाचटा खात होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाने गवत सुद्धा हळदुलं झाल होतं. आणि अशा गवतात आणखी काही चिमुकले पाय दुडदुडत होते.कोण बर हि लाल लाल गोबऱ्या गालांची? अरेच्च्या बरोब्बर. हि तर आपल्या कुनीदेशातली चिमुकली मुलं. गोबऱ्या गोबऱ्या सशांच्या मागे धावणारी गोबरी गोबरी मुलं. सशांशी पकडा पकडी खेळताना मधूनच एखादा ससा हातात आला कि त्याला कुरावाळायची. मग ससा सुद्धा आपल्या लालचुट्टुक डोळ्यांनी लुकलुकत बघायचा त्यांना. आपल्या मऊ ओलसर गुलाबी नाकाने हुंगायचा. मग आपल्या पुढच्या पायांनी हळूच गुदगुल्या केल्या कि मुल सशाला सोडून देऊन हसत बसायची. थोड्यावेळाने ससे नदीजवळ जायचे पाणी प्यायला आणि आंघोळ करायला. मग मुलंसुद्धा त्याच्यामागे जायची. नदीकाठच्या गर्द झाडामधुन गवतावर सांडणाऱ्या उन्हाशी सावलीचा खेळ खेळत बसायची. मध्येच काका , बाबा म्हणजे आई, आज्जीने हाक मारली कि धुम्म पळत घरी यायचे. आणि ससे मग झाडांच्या सावलीत बसून गाढ झोपायचे, अगदी ससाकासवाच्या गोष्टीसारखे.
त्यादिवशी मात्र सगळे ससे झोपलेच नाहीत दुपारी. दुपारभर त्यांची सभा चालू होती, विषय अगदी खासच होता तो म्हणजे उद्याची पौर्णिमा. त्या पौर्णिमेला आपण म्हणतो कोजागिरी पौर्णिमा. कुनिदेशात पण साजरी करतात बर हि नाकाआकी नावाने. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. कुनिदेशात तर तो इतका जवळ येतो कि यामापर्वतावरून उंच उडी मारली कि थेट चंद्रावरच पोचता येतं. हा यामा पर्वत म्हणजे कुनिदेशातला सगळ्यात उंच पर्वत बर का. तर हे सगळे ससे दरवर्षीप्रमाणे चंद्रावरच्या पिकनिकची चर्चा करत होते. कोणी काय करायचे, कुठे कुठे जायचे, कोणते खेळ खेळायचे हे सगळ ठरवत होते. तस चांदणंतलावाजवळ जायचं नक्कीच होतं म्हणा. या चांदणंतलावातल्या चंदेरी पाण्यात छानपैकी आंघोळ केली ना कि सशांचा पांढरा रंग उजळून जायचा. वर्षभरात कुठे काही डागबिग पडले असतील ते निघून ससे चांदीसारखे शुभ्र व्हायचे म्हणे. त्यामुळे तलावातून निघाल्यावर पुढे काय काय करायचं ते ठरवून झालं. पिकनिकला निघण्यासाठीची वेळ आणि ठिकाण पण ठरवून झालं.
दुसरा दिवस फारच धावपळीत गेला. सकाळी खेळायला आलेल्या मुलांशी खेळायला पण सशांना वेळच नव्हता. मुल आपली हिरमुसली होऊन निघून गेली. पण त्यांना सुद्धा माहीत होतं सशांच्या पिकनिकबद्दल. आणि असहि चंद्रावर जाणाऱ्या सशांना बघायला मुलपण यामापर्वताजवळ जाणारच होती.
जसजशी संध्याकाळ व्हायला लागली तसतसे ससे हळूहळू यामापर्वताच्या पायथ्याशी जमू लागले. त्यांना बघायला सगळे लोकं पण जमले. सगळे ससे जमल्यावर मुख्य सशाने शिट्टी वाजवली आणि सगळे ससे भराभरा पर्वतावर चढायला लागले. एक पांढराशुभ्र प्रवाहच डोंगर चढतोय कि काय अस वाटायला लागलं. चंद्रोदय व्हायच्या आधी सशांना पर्वतशिखरावर पोहोचायच होतं त्यामुळे कोणाशीच न बोलता सगळे टणाटणा चढत होते. शिखरावर पोचल्यावर अतीव उत्साहाने सगळेजण चंद्राची वाट बघायला लागले. इथे खाली जमलेले लोकं सुद्धा कधी चंद्र उगवेतोय याचीच वाट बघत होते. हळूहळू क्षितिजावर चंदेरी पिवळट प्रकाश पसरला. एक बारीकशी चंदेरी कडहि दिसू लागली. सशांचा आनंद गगनात मावेना. ते आगदी सरसावून बसले. होताहोता चान्दोबा आकाशात अर्धा उगवला. मुलांनी सशांना हात हलवून टाटा केलं , सशांनीहि मुलांना टाटा करून उंच उड्या मारायला सुरुवात केली. मोठे मोठे ससे एका उडीतच पोचले चंद्रावर, मग त्यांनी छोट्यांचे हात धरून त्यांनाही घेतले वर ओढून. हळू हळू सगळे ससे चंद्रावर पोचले आणि चंद्र आकाशात वरवर जायला लागला. हा अपूर्व सोहोळा कुनिदेशातली मुलं माणसे भान हरपून बघत होती. सगळे ससे पोचल्यावर इथे खाली माणसांच्या उत्साहालापण उधाण आलं. सगळे नाकाअकी नाकाअकी त्सुकि त्सुकि असा घोष करून नाच गाण्यात मग्न झाले. आता रात्रभर ते चंद्र आणि सशांचीच गाणी म्हणणार होते.
इकडे सगळे ससे अगदी ठरल्याप्रमाणे चांदणंतलावाजवळ आले. चांदणंदेवाची प्रार्थना करून आधी शॉवरने अंग स्वच्छ करून एकेकजण तलावात डुबकी घेऊ लागले. डुबकी घेऊन बाहेर आलेले ससे एका वेगळ्याच तेजाने चमकत होते. अशी सगळ्याची आंघोळ झाल्यावर मग सगळे ससे बागेतल्या खेळाकडे वळले. चंदेरी झाडावर लावलेले झोपाळे, चांदीच्या घसरगुंड्या बघून किती खेळू आणि किती नको अस झाल होतं सशांना. चमचमणाऱ्या झोपळ्यावरून आकाशात उंच उंच झोके घेण्याची मजा काही औरच होती. उनाड सशांनी आपली पाळी येईपर्यंत रांग न लावता मध्ये घुसाघुशी सुद्धा केली. मोठ्या सशांनी येऊन भांडण सोडवली म्हणून नाहीतर रडारडीच झाली असती. चांदीच्या मोठ्या मोठ्या गोलगोल वळणांच्या घसरगुंडीवरून जाताना छोट्यांची आधी अगदी घाबरगुंडीच उडाली होती. पण शेवटी धुप्प्कन पाण्यात पडताना आलेली मजा पाहून त्यांची भिती कुठ्ल्याकुठे पळून गेली. काही काही सशांनी तर चक्क बोटिंग पण केलं. वितळलेल्या चांदीसारख्या पाण्यात बोट वल्हवताना मस्त मजा करुन घेतली. आता एवढ खेळल्यावर पोटात भुकेच्या चिमण्या चिवाचीवायला लागल्या.
आणि मग सगळ्यांनी चंदेरी लवलवणाऱ्या गवताच्या कुरणाकडे आपला मोर्चा वळवला. काहींनी गाजरांच्या बागेतच धाव घेतली. कुरकुरीत गोडगोड गाजरं, आणि मऊमऊ गवत चटाचटा पोटात जायला लागल. खाऊन पोट भरल्यावर तिथल्याच झाडांखाली सगळे ससे आळसावले. गप्पा मारत मारत पेंगुळले. काही पिल्लं मात्र परत आपली बागेत जाऊन खेळायला लागली. हळूहळू सकाळ व्हायला लागली होती. चंद्र मावळायचा वेळ जवळ यायला लागला. खरतर चंद्र मावळायला येईल तेव्हा परत सगळ्यांना यामापर्वतावर उड्या मारायच्या होत्या. पण ससे अजून झोपाळलेलेच होते. आणी अचानक मुख्य सशाच्या लक्षात आल कि आता निघायलाच हव. तस मुख्य सशाने परत एकदा घाईघाईने शिट्टी वाजवून सगळ्यांना परत एकाजागी बोलावले. . तेवढ्यात चंद्र आलाच जवळ आलाच होता. पटापट सगळ्यांनी खाली उड्या मारल्या. काहीकाही ससे तर धुप्प्कन पडलेच खाली. काहीकाही अजून झोपेत असलेल्यांना खालीच ढकलून दिलं मोठ्या सशांनी. एवढ्या घाईत कोणाच्याच एक गोष्ट लक्षात आली नव्हती. ती म्हणजे अजून एक पिटुकली ससुली बागेत खेळता खेळता तिथेच झोपली होती. खाली उतरताना झालेल्या घाईत तिच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते. चंद्र आपला मावळून पण गेला. जमिनीवरची नाचणारी लोकं पण घरी गेली.
जमिनीवर परत आल्यावर सशांना कळली आपली चुक. पण आता फारच उशीर झाला होता. चंद्र मावळायाच्या आत जमिनीवर परतायचं हि चांदोबाची अट होती. आणि जर परत नाही आलं जमिनीवर तर चांदोबा त्या सशाला ठेवून घेणार होता खेळायला. अजिबात जमिनीवर जायला देणार नव्हता. फक्त एक मात्र होतं, जर राहिलेला ससा खुपच छोटा असेल तर त्याच्या आई बाबांना पण चंद्रावर जायला मिळणार होते. हि राहिलेली ससुली अगदीच पिटुकली होती. चंद्र मावळल्यावर थोड्याच वेळात ती जागी झाली आणि आजुबाजुला कोणीच नाही अस बघून रडायला लागली. मग चंद्राला वाईट वाटलं आणि लगेच त्याने चंद्रकिरणांची एक लांब दोरी सोडून ससुलीच्या आईबाबांना पण तिथे बोलवून घेतलं. मग तेव्हापासून ससुली आणि तिचे आईबाबा चंद्रावरच रहातात.
दुसऱ्यादिवशी जेव्हा चंद्र परत उगवला तेव्हा लोकांना चंद्रावर एक गम्मतच दिसली. पिटुकली ससुली हात दाखवून सगळ्याना टाटा करत होती.
तुम्हाला कधी केलाय का हो ससुलीने असा चंद्रावरून टाटा?

0 comments:
Post a Comment