मागे एकदा मुलीच्या डेकेअर मध्ये एका मुलाने तलावातून काही बेडकाची डीम्भ आणली होती. मग त्यांच्या शिक्षकेने आणि मुलांनी ती पाळली, अगदी बेडूक होऊन पळून जाई पर्यंत. बेडकाच्या वेगवेगळ्या अवस्था मुलाना आणि मला पण सहज बघायला मिळाल्या. त्यानाच इथे गोष्टीरूप दिलंय
*************
एक होत छोटस तळ. हिरव्यागार रंगाच्या पाण्याच , चहूबाजूला गर्द झाडी असणारं. त्या तळ्यात होती इवलाली लाल कमळे. आणि पाण्यात खालीसुध्दा खूपखूप पाण वनस्पती होत्या.
अशाच एका पाण्यातल्या पानाला एक अगदी चिमुकलं अंड चिकटलं होत, पारदर्शक आणि आणि आत एक चिमुकला केशरी बिंदु. आणि त्याच्या जवळच्या दुसऱ्या पानाला अजून एक अंड होत, तेही पारदर्शक पण आतला बिंदु होता काळा. आता बऱ्याच वेळ एकमेकांच्या बाजूला राहिल्याने त्या अंड्याच्या आतल्या केशरी बिंदु ने शेजाऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
"अरे तू कोण होणार आहेस रे अंड्यातून बाहेर आल्यावर?"
काळा बिंदु म्हणाला, "उम्म्म खरतर मला माहीतच नाहीये."
"मला वाटत तू पण माझ्या सारखा मासा होणार , काळा मासा. मी केशरी मासा तू काळा मासा आपण दोघ मिळून खूप खूप खेळू मग." केशरी बिंदुने सांगितलेली कल्पना काळ्या बिंदुला पण अगदी पटली.
"आपण एकमेकाला काय हाक मारुयात रे?" काळ्या बिंदुने विचारलं
"ह्म्म्म मी तुला चिका म्हणू?" केशरी बिंदुने नाव सुचवले.
"बर, मग मी तुला म्हणणार पिका."
"मी चिका आणि तू पिका
दोघे मिळून करू खूप खूप मजा"
काळ्या बिंदुने लगेच कविता पण केली
थोडे दिवसांनी या चिमुकल्या अंड्यातून इवले इवले शेपटीवाले जीव बाहेर आले.
पिका म्हणाला "बघ, आपल्या दोघांना शेपटी आहे ना? म्हणजे आपण मासेच. कित्ती छान दिसेल ना काळा मासा केशरी मासा एकत्र पोहोताना?"
थोडे दिवस असेच मजेत गेले. चिका आणि पिका दोघे कमळाच्या पानाखाली खेळत चिखलातले किडे खात आणि कमळाच्याच मुळात झोपी जात.
एक दिवस सकाळी उठल्या उठल्या पिका आला आपले नुकतेच फुटलेले नविन कल्ले दाखवायला. आणि बघतो तर काय चिका ला चक्क दोन पाय फुटलेले!
चिकापण विचारात पडला होता. 'अस कस काय झालं बर?'
तेवढ्यात पिका म्हणाला "तू ना आता माणूस बनणार आहेस. बघ तुला कसे माणसासारखे पाय फुटलेत ते."
चिका पिकाच्या भोवती गोल गोल फिरत म्हणाला "नाहीच मुळी बघ मी कसा छान पोहोतोय ते. मी किनई पायवाला मासा होणारे."
पिकाला हि ते पटल आणि ते दोघे आपले नवीन पाय आणि कल्ले वापरून अजून जोरात पोहायला लागले.
परत काही दिवसांनी बघाव तर पिकाचे कल्ले आणि पर मोठ्ठे छान होत आले होते चीकाला मात्र चक्क दोन हात फुटले होते. पिका खुपच दुख्खी होऊन चिकाला म्हणाला.
"चिका तू खरच माणूस होणार का रे? बघ ना आता तुला त्याच्यासारखे हातपण आले. तू माणूस झालास कि मला पकडशील का? नको ना रे पकडूस. मला इथेच तळ्यात राहायचंय."
चिकालाही जरा शंका यायला लागली होती. पण तस काही न दाखवता चिका परत एकदा जोरजोरात गोल गोल फिरला आणि म्हणाला "छे रे माणूस कित्ती मोठा असतो. मी बघ कित्ती चिमुकला. मी कसा एवढा मोठ्ठा होईन? आणि अजून मला शेपटी आहे, अजूनही मी पाण्यातच राहतो जमिनीवर जायला कुठे येणार आहे मला? मी आपला हातपायवाला मासा."
आपल्या हातांनी पिकाच्या पंखाना टाळी देऊन दोघ आपल्या किडे खायच्या उद्योगाला निघून गेले.
अजून काही दिवस गेले आणि पिका सुंदर केशरी,पांढरे पट्टेवाला मोठे मोठे पंखवाला मासा झाला होता. आणि चिकाचा काळा रंग जाऊन तो चक्क ठिपकेदार हिरवा झाला होता. त्याच शेपूट सुध्दा गायब झालं होतं.
मग मात्र पिका म्हणाला "चिका तू नक्कीच मासा नाहीयेस अस मला वाटत. तुला हात पाय आहेत. खरतर पाण्यात पोहायला हात पाय नसले तरी चालत. म्हणजे तुला कदाचित जमिनीवरपण चालता येईल. बघतोस का प्रयत्न करून? अगदी तळ्याच्या काठावर कर म्हणजे नाहीच जमल, किंवा गुदमरलास तर तुला लग्गेच परत पाण्यात येता येईल."
चिकाला पण आता मोठ्ठी उडी मारायची इच्छा होत होती. पिकाच सांगण ऐकून बघाव अस त्यानेहि ठरवलं.
झालं दुसऱ्या दिवशी दोघे तळ्याच्या काठाजवळ गेले. चिकाने जोर लावून उडी मारली आणि काय आश्चर्य चिका चक्क जमिनीवर बसला होता. त्याला आजिबात गुदमरल्यासारख झालं नाही.स्वच्छ हवा , उबदार उन पाहून मजाच वाटली.
इथे पिका पाण्यातून पहात होताच. चिका ठीक असल्याच पाहून पिकाला पण बर वाटलं.
तेवढ्यात तलावाजवळ दोन लहान मुल आली आणि चिकाला बघून म्हणाली "अरे तो बघ पिल्लू बेडूक." त्याच्या त्या आवाजाने चिका दचकला आणि परत पाण्यात पळाला.
तिथे पिकाचा पंख पकडून गोल गोल नाचत म्हणाला "अरे! मी बेडूक आहे. मासा नाही. आणि मला किनई पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे रहाता येत."
मग तेव्हापासून चिका कधी कधी जमिनीवर येतो, आणि परत पाण्यात जाऊन पिकाला जमिनीवरच्या गमतीजमती सांगतो. आणि दोघे मिळून त्यांच गाण सुद्धा गातात.

0 comments:
Post a Comment