सध्या कोरोना विषाणुच्या साथीमुळे सगळेच घरात आहेत, किंवा घरून काम करत आहेत. घरात राहीलं की मुलांनाही काहीतरी वेगळं हवं असतं, त्यांचा वेळ जात नाही पण त्याचवेळी पालकांना सतत मुलांबरोबर खेळणंही शक्य नाही त्यामुळे हा एक नविन प्रयोग !
काही बालकथा रेकॉर्ड करून पाहू असा विचार माझ्या डोक्यात आला आणि लगोलग ही कल्पना संजय नाईक यांच्या कानावर घातली, कारण ऑडियो रेकॉर्डिंगची माहिती तेच देऊ शकले असते. रेकॉर्डींग कोणी करायचं हाही प्रश्नच होता कारण सुस्पष्ट, सुरेख आवाज हवा, आणि अर्थात छान चढउतार , भावना आवाजातून पोचायला हव्यात! पण चक्क अॅड. माधवी नाईक स्वत:च या नव्या प्रयोगात सहभागी व्हायला तयार झाल्या, आणि ही कल्पना वर्कआऊट होणार असं मला वाटायला लागलं. सगळे बंद असल्याने आपापल्या घरीच काम करायचं होतं. संजय आणि माधवीताई यांनी लगेच मोबाईलवर दोन कथा रेकॉर्ड करुन पाठवल्यादेखील. स्टूडियो नसल्याने बारीकसरिक काही एडिटिंग लागलं तर घरी स्पृहा करू शकणार होती , ते तिने केलं देखील. पण तिला वाटलं की याला पार्श्वसंगीत आणि ऑडियो इफेक्टही द्यायला हवेत!! त्यामुळे तिने त्यावर अजुन काम केलं आणि पहिली ऑडियो फाइल तयार झाली. ती ब्लॉगवर शेअर करत आहे.
पहिलाच प्रयोग असल्याने चुका असतील, काही कमतरताही असतील तर त्या नक्की आमच्यापर्यंत पोचवा. म्हणजे पुढच्या वेळेस दुरुस्त करता येतील.
विशेष आभार - अॅड. माधवी नाईक आणि संजय नाईक
पहिलाच प्रयोग असल्याने चुका असतील, काही कमतरताही असतील तर त्या नक्की आमच्यापर्यंत पोचवा. म्हणजे पुढच्या वेळेस दुरुस्त करता येतील.
विशेष आभार - अॅड. माधवी नाईक आणि संजय नाईक
#बालकथा
#गंमतगोष्टी #कथाकथन
#कथाकथी
#ऐका
#कथाऐका
#ऑडियोकथा
#ऑडियोबुक
#ऑडियोब्लॉग
#marathiaudiobook
#marathikadha
#marathichildrenbook
#audioblog
#audiobook
#listenstories
#kathaaAika
0 comments:
Post a Comment